नाशिक : अयोध्यातल्या राम मंदिराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा जवळ येतोय तसतसे कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये वाढत जाऊन, “कर्नाटकी कशिदा त्यांनी काढिला, काँग्रेसची बोट लागली बुडायला”, असे म्हणायची वेळ त्या नेत्यांनी आणली आहे!! राजस्थान, मध्य प्रदेश छत्तीसगड यांच्यासारखी महत्त्वाची राज्ये गमवून देखील काँग्रेस नेते सुधारायला तयार नाहीत, हेच त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी स्वतःच दाखवून दिले आहे.Karnataka Congress leaders criticism of ram mandir and hindu dharma will sink its boat by themselves
कर्नाटकातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा सपाटाच लावला आहे. कर्नाटक मधले एक माजी मंत्री एच. के. अंजनेय यांनी वादग्रस्त वक्तव्यांची सुरुवात केली. ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाच “खरा राम” म्हणाले कर्नाटकात सिद्धरामय्या हेच आमचे राम असताना अयोध्येत कशाला जायचे?? तिथल्या भाजपच्या रामाची पूजा कशाला करायची??, अशी मुक्ताफळे अंजनेय यांनी उधळली.
त्यांच्या पाठोपाठ कर्नाटक मधले दुसरे काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी कर्नाटकात 22 जानेवारी पूर्वी “गोध्रा कांड” घडू शकते, अशी धमकीवजा भाषा वापरली. वास्तविक बी के हरिप्रसाद हे फक्त कर्नाटक केंद्रित राजकारण करणारे नेते नव्हेत ते काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवर वावरलेले नेते आहेत पण ते देखील बिथरल्यासारखे “गोध्रा कांडा”चे वक्तव्य करून बसले.
… आणि ही दोन वादग्रस्त वक्तव्य कमी पडली म्हणून की काय, दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव यतीन्द्र सिद्धरामय्या यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करून टाकले. संघ आणि भाजपच्या राजवटीत भारत “हिंदू पाकिस्तान’ बनेल असे यतींद्र सिद्धरामय्या म्हणाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये धर्मांध हुकूमशहांनी त्यांच्या देशांना दिवाळखोर बनवले. भारतात संघ आणि भाजप हिंदू राष्ट्र बनवून भारताला “हिंदू पाकिस्तान” करतील अशी मुक्ताफळे यतींद्र सिद्धरामय्या यांनी उधळले.*
कर्नाटक मधल्या जनतेने अवघ्या 7 – 8 महिन्यांपूर्वीच भाजपची राजवट बाजूला करून काँग्रेसच्या हाती पूर्ण बहुमताने सत्ता सोपवली होती. काँग्रेसचे नेते तिथे शहाणपणाने राज्य करतील अशी अपेक्षा ठेवून जनतेने काँग्रेसला मते दिली होती, पण प्रत्यक्षात ते शहाणपणाचे राज्य तर सोडाच, उलट कर्नाटक मधली सत्ता काँग्रेस नेत्यांच्या एवढी डोक्यात गेली, की ती वेगवेगळ्या मुक्ताफळांच्या मार्गाने आता बाहेर पडत आहेत. त्यातूनच देशात राम मंदिर लोकार्पणाचा प्रचंड उत्साह ओसंडून वाहत असताना काँग्रेस नेत्यांच्या तोंडी “गोध्रा कांड”, “हिंदू पाकिस्तान” असली भाषा यायला लागली आहे. काँग्रेसची बोट कर्नाटकातून बुडायला सुरुवात झाली आहे.
Davanagere | Congress leader and son of Karnataka CM Siddaramaiah, Yathindra Siddaramaiah says, "Pakistan and Afghanistan have been bankrupted by the dictatorship in the name of religion…Affiliate organizations of the BJP are going to make India a Hindu country. If this is… pic.twitter.com/TTjPRJj1gK — ANI (@ANI) January 3, 2024
Davanagere | Congress leader and son of Karnataka CM Siddaramaiah, Yathindra Siddaramaiah says, "Pakistan and Afghanistan have been bankrupted by the dictatorship in the name of religion…Affiliate organizations of the BJP are going to make India a Hindu country. If this is… pic.twitter.com/TTjPRJj1gK
— ANI (@ANI) January 3, 2024
3 राज्यांमध्ये फटका, तरी नाही सुधारणा
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन आणि टू जी घोटाळ्यातले आरोपी ए. राजा आदी नेत्यांनी सनातन धर्माचा अपमान केला. समाजवादी पार्टीचे नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी रामचरितमानस या ग्रंथाचा अपमान केला. या सगळ्याचा फटका मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बसला. छत्तीसगड आणि राजस्थान ही हातची राज्ये काँग्रेसने गमावली. तेलंगणात देखील भाजपने विधानसभेत चंचूप्रवेश करण्यात यश मिळवले, तरी देखील काँग्रेस आणि त्यांच्या INDI आघाडीतले नेते सुधारायला तयार नाहीत, हेच कर्नाटक मधल्या काँग्रेसच्या तीन नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यातून दिसून आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App