विशेष प्रतिनिधी
कल्याण : वाहतूक पोलिसांची ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली अनेकदा काहींना डोकेदुखी ठरत असते.त्याचे ताजं उदाहरण कल्याण शहरात पाहायला मिळाले आहे. कल्याण पूर्व मलंग रोड द्वारली गावात राहणारे गुरुनाथ चिकणकर या रिक्षाचालकाला ऑनलाइन चलान आले त्याने ऍपवर तपासून पाहिले असता चक्क हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांचा दंड आकाराला आहे. Kalyan’s rickshaw puller fined for not wearing a helmet; Strange work of traffic police
मुंबईच्या कांदिवली भागात ३ डिसेंबर रोजी एक दुचाकीचालक विना हेल्मेट प्रवास करत होता.त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला. त्याचे हे चलन असल्याचे समोर आले आहे. मात्र आता या दुचाकीचालकाचा दंड ऑनलाइन प्रणालीच्या इ चलनद्वारे रिक्षाचालक गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे. सुरुवातीला मोबाईलवर या दंडासंबंधी माहिती आल्यानंतर रिक्षाचालक गुरुनाथला धक्काच बसला. त्यांनी या प्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले. मात्र माझी चूक नसतांना मी ठाणे येथे का जावे,वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी, अशी मागणी गुरुनाथने केली आहे.
या सगळया प्रकरणामुळे गुरुनाथला मानसिक त्रास झाला आहे. आता या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी त्याने केली आहे. तर वाहतूक पोलिसांनी आपल्या ई चलन पध्दतीत काम करताना निदान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यालाच दंड आकारला जातो आहे का?याची माहिती नीट तपासून संबंधीताचा मोबाईल वर नोटीस पाठवावी, अन्यथा अनेकांना या ई चलन प्रणालीचा नाहक त्रास होणार असल्याचे प्रतिक्रिया रिक्षाचालकाचे नातेवाईक मदन चिकणकर यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App