प्रतिनिधी
मुंबई : सरकारी खात्यांमध्ये सध्या भरती बंद असताना तरुणांना मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नाशिक महावितरण येथे नोकरीची संधी आली आहे. या ठिकाणी नोकर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.Job Opportunities: Recruitment for various posts in Mumbai Port Trust, Nashik MSEDCL; Apply today !!
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 9 जागा
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये सध्या 9 जागांसाठी भरती होणार आहे. यात उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदासाठी एकूण आठ जागा उपलब्ध आहेत. याकरता मेकॅनिकल इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा समतुल्य तसेच 12 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.
उपमुख्य दक्षता अधिकारी पदासाठी एक जागा उपलब्ध आहे. यासाठी पदवीधर असण्याची असण्याची अट आहे. 42 वर्षांपर्यंत वयोमर्यादा यासाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22, 23, 27 जून 2022 आहे. www.mumbaiport.gov.in या वेबसाईटवर तुम्ही अधिकचे तपशील पाहा.
अर्ज येथे पाठवा
सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, एस व्ही मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४००००१
नाशिक महावितरणमध्ये १४९ जागा
नाशिक येथील महावितरण कार्यालयात इलेक्ट्रिशियन, वायरमनसाठी भरती होणार आहे. यासाठी 10 वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण 149 जागांसाठी ही भरती आहे. 18 ते 21 वर्षांपर्यंतचे उमदेवार यासाठी अर्ज करु शकतील. आज 3 जून 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकची माहिती तुम्ही www.mahatransco.in या वेबसाईटवर तपासू शकता.
अर्ज कुठे पाठवाल?
अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिक रोड, नाशिक – ४२२१०१
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App