विशेष प्रतिनिधी
मुंबई : शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात येणार असल्याची अफवा खरी असल्याची गृहीत धरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळ्यासमोर मनुस्मृती जाळा आंदोलन केले, पण मनुस्मृती जाळण्याच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून टाकला. त्यामुळे आव्हाड पूर्णपणे अडचणीत आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता लक्षात येताच आव्हाड यांनी लीन होऊन माफी मागण्याचा प्रयत्न केला. Jitendra Awhad tore Ambedkar’s photo
केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृति आणणार, अशी अफवा समाजकंटकांनी सोशल मीडियावर पसरवली. ती खरी असल्याचे मानून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळ्यापाशी मनुस्मृती जाळा आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले त्यानुसार ते आंदोलन स्थळी पोहोचले. तिथे मनुस्मृती हे शब्द लिहिलेले आंबेडकरांचे पोस्टरच आव्हाडांनी फाडून टाकले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर संताप उसळला. मनुस्मृति जाळण्याच्या नादात आव्हाडांनी आंबेडकरांचे पोस्टर फाडले म्हणून सोशल मीडिया त्यांच्याविरुद्ध प्रचंड संताप उसळला.
जाहीर निषेध!जाहीर निषेध!स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी. pic.twitter.com/VnQBCxwm3q — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 29, 2024
जाहीर निषेध!जाहीर निषेध!स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी. pic.twitter.com/VnQBCxwm3q
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 29, 2024
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांना पुरते घेरले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आपल्यावर कायदेशीर बडगा उगारला जाऊ शकतो हे लक्षात येताच जितेंद्र आव्हाड नरमले. आपण लीन होऊन माफी मागतो, असे ते म्हणाले. पण मनुस्मृति जाळण्याच्या नादात आपण बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडतो आहोत याचे साधे भान देखील आव्हाडांना राहिले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ते प्रचंड ट्रोल देखील झाले. अफवेवर आधारलेले आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्याच पूर्ण अंगाशी आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App