विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचे नेते नेहमीच पुरोगामी संस्कारांच्या आणाभाका घेत असतात पवारांनी “पुरोगामी संस्कार” महाराष्ट्रात कसे रुजविले, याची बहारदार वर्णन करत असतात, तेच पवारांच्या पुरोगामी संस्कारांचे पेव आज फुटले आणि चोर, पाकीटमार, नामर्दाची औलाद मेंदूला लकवा या “शब्दफुलांनी” बाहेर आले!! Jitendra Awhad target to ajit pawar
पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या अनुयायांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार जुंपली. त्यांनी एकमेकांना वर उल्लेख केलेल्या शब्दांची लाखोली वाहिली. याची सुरुवात जितेंद्र आव्हाडांनी केली. अजितदादांच्या राष्ट्रवादीवर त्यांनी चोरांची टोळी, पाकीटमार, मर्दाची औलाद नव्हते म्हणून पक्ष आणि चिन्ह चोरले, अशा शब्दांची लाखोली वाहिली.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी, सुरज चव्हाण, रूपाली ठोंबरे या तिघांनी जितेंद्र आव्हाडांच्या या “शब्दफुलांची” परतफेड केली. जितेंद्र आव्हाड मानसिक रुग्ण झाले आहेत. त्यांच्या मेंदूला लकवा मारला आहे, अशी “शब्दफुले” रूपाली ठोंबरे यांनी उधळली. त्याआधी सुरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांना पराभव समोर दिसत असल्याने मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगितले. अमोल मिटकरी यांनी मुंब्रा मध्ये जाऊन जितेंद्र आव्हाडांना पाडू, असे आव्हान दिले.
पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या या संघर्षातून त्यांच्या पुरोगामी संस्कारांचे पेव फुटले. एरवी पवार कसे पुरोगामी आहेत, त्यांनी महाराष्ट्रात पूर्वगावी संस्कार कसे रुजविले, याची बहारदार वर्णने त्यांचे हेच अनुयायी करतात, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात मात्र रणांगणात मात्र ते एकमेकांवर चोर, पाकीटमार, नामर्दाची औलाद, मेंदूला लकवा या शब्दांची उधळण करून एकमेकांचे वस्त्रहरण करतात, हेच महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचे नेते नेहमीच पुरोगामी संस्कारांच्या आणाभाका घेत असतात पवारांनी “पुरोगामी संस्कार” महाराष्ट्रात कसे रुजविले, याची बहारदार वर्णन करत असतात, तेच पवारांच्या पुरोगामी संस्कारांचे पेव आज फुटले आणि चोर, पाकीटमार, नामर्दाची औलाद मेंदूला लकवा या “शब्दफुलांनी” बाहेर आले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App