बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

jhimma 2 marathi movie coming soon

विशेष प्रतिनिधी 

पुणे : दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला आणि करोना काळानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे झिम्मा. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू केली होती. जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. त्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. jhimma 2 marathi movie coming soon

झिम्मा’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकरल्या होत्या. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. नुकतंच अभिनेत्री सायली संजीवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सायली संजीवने नुकतंच एक टीझर प्रदर्शित केला आहे. यात तिने “तुमचे आमचे रियुनियन- झिम्मा २” असे म्हटले आहे. “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

jhimma 2 marathi movie coming soon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात