
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आता असदुद्दीन ओवैसी यांच्याशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात डबल M अर्थात मराठा + मुस्लिम कार्ड खेळायच्या बेतात असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरून आता आमदार सदाभाऊ खोत मनोज जरांगे यांना एक खोचक सल्ला दिला. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पिच्छा सोडून आता शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा, असा टोला सदाभाऊ खोत यांनी हाणला. Jarangs should leave Fadnavis and move towards Baramati
सदाभाऊ खोत म्हणाले :
रयत क्रांती संघटनेला यावेळीही भाजपने विधान परिषदेची 1 जागा देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा सन्मान केला. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझाही सन्मान करून मला संधी दिली. शेवटी आम्ही एका कुटुंबातील आहोत. आम्ही कधीही विचार सोडलेला नव्हता. आम्ही तत्व सोडलेले नव्हते. कोणत्याच पक्षाने घटक पक्षाला येवढा मोठा सन्मान दिलेला नाही. भाजपने महादेव जानकर, विनायक मेटे यांना विधान परिषद दिली होती. तसेच मलाही दुसऱ्यांदा विधान परिषद दिली. भाजपने विस्थापित वर्गाला न्याय दिला.
- आरक्षणाच्या प्रश्नावर माझी भूमिका मी वेळोवेळी मांडली आहे. राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की ओबीसींचं आरक्षण कोणालाही जाणार नाही. मराठा समाजाला सरकारने 10 % आरक्षण दिले. ते सरकारने टिकवावं आणि तेच आरक्षण मराठा समाजाला भविष्यात कायम राहू शकतं. आता दुसऱ्या बाजूला जो काही गदारोळ चालला आहे. कोणी उठावं आणि आंदोलन करावं. पण कोणतंही सरकार सत्तेत आलं तरी कोणाच्याही आरक्षणामध्ये दुसऱ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही.
- महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाने राजकारण केलं जात आहे. एखाद्या जातीचा विषय घेतला की नेता होता येतं. मात्र, खऱ्या अर्थाने समाजाला पुढे घेऊन जायचे असेल तर दीर्घकालीन लढाई लढावी लागते. आता लोकसभेच्या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्यांवर मतदान झालं. विरोधकांकडून सांगितलं गेलं की भाजपा आरक्षणाला विरोध करत आहे. आता विरोधकांनी लेखी द्यावं की आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही लिहून द्यावे.
- मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, असं शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने जाहीर करावं. ते जर तसं जाहीर करणार नसतील तर मी मनोज जरांगे यांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आणि भाजपाचा पिच्छा त्यांनी सोडावा आणि बारामतीच्या दिशेने तुमचा मोर्चा वळवावा.
Jarangs should leave Fadnavis and move towards Baramati
महत्वाच्या बातम्या
- नाव थॉमस मॅथ्यू, वय 20 वर्षे… डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली!
- आंध्र प्रदेशचे माजी CM जगन रेड्डी यांच्याविरुद्ध FIR; टीडीपी आमदाराचा खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप
- ओवैसींबरोबर “डबल M” कार्ड खेळायला मनोज जरांगे तयार; पण प्रस्ताव – फ्रस्ताव नाही देणार!!
- तामिळनाडू बसपा प्रमुखाच्या हत्येतील आरोपींचे एन्काउंटर; पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना ठार