संभाजी राजेंच्या आग्रहाखात जरांगे पाणी प्यायले, पण सरकारला ताळ्यावर आणि म्हणाले!!

प्रतिनिधी

जालना : 50% च्या आतलं ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी दमबाजी करत मनोज जरांगे पाटील आज संभाजी राजांच्या आग्रहाखातर पाणी प्यायले, पण सरकारला ताळ्यावर आणीन म्हणाले!! Jarange drank water at the insistence of Sambhaji Raje

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केल्यानंतर आज पहिले नेते माजी खासदार संभाजी राजे त्यांना भेटले. तब्येतीची काळजी घ्या, असे संभाजी राजेंनी त्यांना सांगितले. संभाजी राजेंच्या आग्रहाखातर मनोज जरांगे आज पाणी प्यायले. पण सायंकाळी त्यांनी उद्यापासून पाणी देखील घेणार नाही असे सांगून सरकारला ताळ्यावर आणीन, असे म्हणाले. सरकारमधल्या मंत्र्यांवर टीका करण्याची भूमिका आजही त्यांनी कायम ठेवली.



पंजाबराव देशमुख यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सांगितले होते. मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतलेच आरक्षण पाहिजे. ते ओबीसी मधूनच पाहिजे. कारण 50 टक्क्यांवरचे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकत नाही, अशी वक्तव्य जरांगे पाटलांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले असतील तर आनंदच आहे. त्यांनी तिथून रिकाम्या हाताने परत येऊ नये. आरक्षण घेऊनच परत यावे, अन्यथा सरकारला मराठा समाजाची शांतता यापुढे झेपणार नाही, असा दमही जरांगे पाटलांनी दिला.

शिंदे – फडणवीस दिल्लीत, उद्या मोदी शिर्डीत

मराठा आरक्षण, शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या अपात्र आमदारांची विधानसभा अध्यक्षांचे समोर सुनावणी, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्याची बातमी आहे. ते दोघे तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटत आहेत. त्याचबरोबर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येऊन 7500 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. शिर्डीत ते साई दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Jarange drank water at the insistence of Sambhaji Raje

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात