वृत्तसंस्था
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार सुरु केलेली जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहणार आहे. त्यात कोणताही खंड पडणार नसून ती शुक्रवारपासून(ता. २७) पूर्ववत सुरु राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.Jan Aashirwad Yatra will not be interrupted;Resumes from Friday: Narayan Rane
नारायण राणे यांना न्यायालयाने जमीन दिल्यानंतर आज निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राणे म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन सात वर्ष झाली. या सात वर्षात त्यांनी केलेलं काम सर्वसामान्यांपर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावं हे सांगण्यासाठी ही जनआशीर्वाद यात्रा आयोजित केली होती.
दुसरं म्हणजे मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. तसेच राज्यातील आणि देशातील अनेक खासदारांना मंत्री बनवण्यात आले. त्यांना मोदींनी सर्वांना आपापल्या राज्यात जनतेचं आशीर्वाद मागण्यास सांगितलं.
तसेच या माध्यमातून खात्याच्या कामास सुरुवात करण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही १९ तारखेपासून जनआशीर्वाद सुरु केली. मी कालपर्यंत यात्रेत होतो. आता दोन दिवस गॅप ठेवला आहे. परवापासून पुन्हा यात्रा सुरू होईल. यात कोणताही गॅप पडणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App