मोदींचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस मैलाचा दगड ठरणार, असल्याचं फडणवीस म्हणाले.
जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस! मराठवाडासाठी अतिशय आनंदाचा दिवस असल्याचेही सांगितले.
विशेष प्रतिनिधी
जालना: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्री क्षेत्र अयोध्या येथून ऑनलाईन पद्धतीने जालना ते मुंबई या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत या रेल्वे सेवेचे लोकार्पण केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस जालना येथे उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.Jalna to Mumbai Vande Bharat Express started by Modi, Fadnavis traveled
तसेच जालना ते छत्रपती संभाजीनगर असा या रेल्वेतून प्रवास देखील त्यांनी केला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, जालना व मराठवाडा वासियांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्रात सध्या 6 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्या आहेत. जालना येथून आज वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार.
तसेच या रेल्वेमुळे केवळ मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे मुंबईशी जोडली जाणार नसून मनमाड, नाशिक ही शहरे देखील वंदे भारत रेल्वेमुळे मुंबईशी जोडली जाणार आहेत. सध्या 160 कि.मी प्रति तास धावणारी ही ट्रेन दोन वर्षात 250 कि.मी प्रति तास धावेल. या रेल्वेमुळे मराठवाड्यातील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. असंही फडणवीसांनी सांगितलं.
याशिवाय महाराष्ट्रामध्ये 1 लाख 6 हजार कोटींची रेल्वेची कामे सुरु असून यावर्षी आपल्याला 13 हजार कोटी मिळाले आहेत. या माध्यमातून राज्यामध्ये अनेक रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोच फॅक्टरीमध्ये बनविण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस ही मैलाचा दगड ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App