शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील निवासस्थानी ईडीने शुक्रवारी सकाळी साडे ८ वाजता छापा टाकला आहे. Jalna: ED raids Arjun Khotkar’s house, a team of 12 arrives for investigation
विशेष म्हणजे
जालना : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.दरम्यान अवघ्या काही दिवसांनी ही याबाबत छापेमारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील निवासस्थानी ईडीने शुक्रवारी सकाळी साडे ८ वाजता छापा टाकला आहे.
सकाळी साडे ८ वाजल्यापासून ईडीचे पथक अर्जुन खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये आहेत.१२ जणांचं पथक या ठिकाणी तपासणी करत आहे.अर्जुन खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे.
जेव्हा सकाळी खोतकरांच्या घरावर छापा पडला तेव्हा अर्जुन खोतकर हे घरीच होते.औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये अर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केलेली. तसेच यापूर्वी खोतकरांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण फक्त कारखान्यात भागीदार आहोत. कारखान्याचे मालक नाही, असं अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App