याचसाठी केला होता अट्टाहास, गुन्हा रद्द करण्यासाठी समीर खान उच्च न्यायालयात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एनसीबीचे (अंमली पदार्थ विरोधी विभाग) समीर वानखेडे यांच्या विरोधात अल्पंसख्यांक विभागाचे मंत्री नबाब मलिक यांनी आरोपांची राळ उठविली आहे. राष्ट्र्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही समीर यांच्याकडे अंमली पदार्थ नव्हे तर हर्बल तंबाखू सापडली असे म्हटले होते.It was for this, Sameer Khan in the High Court to quash the crime

हा सगळा अट्टाहास कशासाठी होता हे आता उघड झाले आहे. नबाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी आता गुन्हा रद्द करावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.एनसीबीने जप्त केलेल्या कथित अमली पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता अहवाल नकारात्मक आला होता.



त्यामुळे न्यायालयाने गुन्हा होत नसल्याचे म्हणत जामीन मंजूर केल्याचे समीर खान यांनी याचिकेत म्हटले आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा होत नसल्याने एनसीबीने नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी समीर खान यांनी याचिकेत केली आहे.

समीर खान यांना १३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. समीर खान किंवा त्यांच्या माणसांकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले नाहीत. एनसीबीने पाठविलेल्या १८ नमुन्यांपैकी केवळ एका नमुन्यात ७.५ ग्रॅम गांजा आढळला. त्यामुळे आरोपींकडून अमली पदार्थांचे कमर्शिअल प्रमाण आढळले, हा एनसीबीचा दावा चुकीचा आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी त्यांच्या जावयाकडे आढळलेली वनस्पती गांजा नसून हर्बल तंबाखू होती असे नुकतेच म्हटले होते. यावर शरद पवार यांनीही ती एक प्रकारची वनस्पती होती असा बचाव केला होता. यावरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

It was for this, Sameer Khan in the High Court to quash the crime

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात