उद्धव ठाकरे- अजित पवार सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या बंगल्यावर बळजोरीने बोलावून पोलिसांकरवी त्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आता न्यायालयात आहे. It is alleged that Jitendra Awhad, a minister in the Thackeray-Pawar government, forcibly called a common man to his bungalow and beat him up by the police. The case is now in court.
प्रतिनिधी
मुंबई : अनंत करमुसे प्रकरणात तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र ठाकरे-पवार सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाडांवर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्यपालांकडे आव्हाड यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
गुरुवारी आव्हाड यांच्या अटक आणि जामीन प्रकारणानंतर शुक्रवारी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनंत करमुसे यांची भेट घेतली.
अनंत करमुसे यांच्या एका ट्वीट वरून, राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समक्ष त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आव्हाड यांना अटक होऊन त्वरीत जामीन झाला होता, यावर सोमय्या यांनी कडक शब्दात निंदा केली. सचिन वाजे, मनसूख हिरण अपहरण आणि हत्या, १०० कोटी वसुली प्रकरण अशी एकापाठोपाठ एक प्रकरणे ठाकरे सरकारच्या काळात उघड झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांनीच आपल्या विरोधात कोणी बोलू नये यासाठी आव्हाड यांना नेमले होते. त्यातूनच अशी दहशत माजवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे सरकार हे माफीयांचे सरकार असल्याची टीका सोमय्या यांनी केली. करमुसे यांच्या या प्रकरणात तीन कॉन्स्टेबल निलंबित झाले परंतु जितेंद्र आव्हाड हे मंत्री असल्यानेच त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात आव्हाड यांच्यावर कारवाई होण्यासाठी आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
“आता खऱ्या अर्थाने लढाई सुरु झालेली आहे, त्यामुळे आपल्यावर झालेल्या हल्याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी,” अशी मागणी अनंत करमुसे यांनी केली. या प्रकरणी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु त्यानंतर एक वर्षानंतर केवळ अटक आणि तत्काळ सुटका होते, हे अतिशय दुर्देवी असल्याचे करमुसे म्हणाले. “तुम्ही मंत्री आहात, म्हणून सुटलात. परंतु सामान्य माणसाची यात काय चूक,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “मी अश्लील पोस्ट शेअर केलेली नव्हती, किंवा त्यांच्या घरातल्यांच्या बाबतही कोणत्याही प्रकारे बोललो नव्हतो,” असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App