संदीप कर्णिक यांनी पुणे शहर सह पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार शुक्रवारी सायंकाळी स्वीकारला. त्यांनी मावळते सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
विशेष प्रतिनिधी
पुणे– राज्य गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर संदीप कर्णिक यांनी पुणे शहर सह पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार शुक्रवारी सायंकाळी स्वीकारला. त्यांनी मावळते सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याकडून पदभार स्वीकारला.IPS Sandip karnik take charge of joint police commissioner pune
पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी कर्णिक यांची पुणे सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्णिक हे (पश्चिम प्रादेशिक विभाग) बृहन्मुंबई येथे अपर पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांना आता पुणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर, शिसवे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App