वैष्णवी ढेरे
नाशिक : संस्कृत ही मूर्त मृत किंवा संपुष्टात आलेली भाषा नसून ती व्यापक आणि सर्व क्षेत्रांना व्यापून उरणारी भाषा आहे असे प्रतिपादन श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्राचे प्राचार्य अतुल तरटे यांनी केलेInternational Sanskrit Day special: New opportunities or career in sanskrit language informative interview of principle Atul Arvind Tarate.
आज श्रावणी पौर्णिमा म्हणजेच संस्कृत दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदास विद्यापीठशी संलग्न श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्राचे प्राचार्य अतुल अरविंद तरटे यांच्याशी thefocusindia.com च्या वतीने संवाद साधला असता तरटे सरांकडून उत्कृष्ट माहिती आणि मार्गदर्शक मिळाले. संस्कृत मध्ये करियर कशा पद्धतीने पुढे ने नेता येईल. संस्कृतचा इतर क्षेत्रातील वापर या विषयी सांगताना तरटे सरांनी अनेक आधुनिक शास्त्रामध्ये संस्कृतची महती पटवून दिली.
वैदिकी ते वैद्यकीय शास्त्रापर्यंत संस्कृत किती प्रगत होत आहे. युवा पिढीला संस्कृतमध्ये करियर करताना फक्त प्रोफेसर म्हणूनच नाही तर संशोधक म्हणून देखील मोठ्या संधी आहेत. संगणक शास्त्र, औषध निर्माण शास्त्र, वैद्यकीय शास्त्र, योगशास्त्र, डिकोडिंग अधिक क्षेत्रांमध्ये संस्कृतचा वापर वाढतो आहे अशी माहिती त्यांनी दिली.
कविकुलगुरू विश्वविद्यालय याशी संलग्न श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्रात बेसिक ते प्राविण्य मिळवू शकू अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहेच, पण त्याच बरोबर येथे संस्कृत विषयक राबविल्या जाणारे प्रकल्प देखील तेवढच संस्कृत मधील लस वाढवणारे आहेत. संस्कृत dead लँग्वेज म्हटले जाते पण एकंदरीत संस्कृत ही dead किंवा waste लँग्वेज नसुन vast लँग्वेज आहे असे म्हटले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App