विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादाना विधीचे विकृत पद्धतीने मंत्र म्हणून पुरोहित वर्गाचा आणि ब्राह्मण समाजाचा अवमान केला. या मुद्द्यावर महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात संताप उसळल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी हात झटकून टाकले. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्याला काही माहिती नाही, असे सांगून पंढरपुरातून ब्राह्मण समाजाच्या घेरावातून काढता पाय घेतला तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर प्रश्न विचारतात संतापून निघून गेले. Insult of Brahmin community: Ajit Dada left in anger after asking questions on Amol Mitkari’s statement !!
मला विकासावर प्रश्न विचारा. मी तुमच्या कॅमेरा समोर बोलायला तयार आहे. पण इथून पुढे कोण काय बोलले याबद्दल मला विचारले, तर मी मला उत्तर देणार नाही. तुमच्या कॅमेरा समोर बोलणे बंद करून टाकीन, असा इशाराच अजित पवारांनी पुण्यात टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यासमोर दिला.
त्याचवेळी अजित पवारांनी भारनियमन संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिले. देशात सर्वत्र कोळसा टंचाई आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने मागणी विजेची मागणी वाढली आहे. कोळसा मंत्रालयाला कोळसा पुरवठ्यासाठी पत्र पाठवले आहे. स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्रात भारनियमन होऊ नये म्हणून लक्ष घालत आहेत. त्यांनी तशा सूचना महाराष्ट्रात सर्वत्र दिल्या आहेत. मंत्रिमंडळातील सहकारी देखील या विषयावर गांभीर्याने लक्ष देत आहेत, असे उत्तर अजितदादांनी दिले.
मात्र त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच, मी तुम्हाला किती वेळा सांगितले कोण काय बोललं? त्यावर मला प्रश्न विचारत जाऊ नका म्हणून… मला फक्त विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारा. नाहीतर मी तुमच्या कॅमेरा पुढे बोलणे बंद करून टाकेन, असे म्हणून त्यांनी गाडीच्या ड्रायव्हरला गाडी सुरू करायला सांगून ते निघून गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App