राज्यात मोठ्या प्रमाणात महाराजांची कीर्तनं ऐकली जातात. परिणामी आता सरकार काय करतं ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. Indurikar Maharaj again caught up in the controversy, Trupti Desai demanded his arrest
विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवृत्ती महाराज इंदुरीकर अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.दरम्यान इंदुरीकर महाराजांनी कोरोनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.त्यामुळे राज्यभरातून महाराजांवर कारवाईची मागणी करत आहेत.तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात महाराजांची कीर्तनं ऐकली जातात. परिणामी आता सरकार काय करतं ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि ज्या लोकांनी कोरोनात माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणारचं, असं कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर महाराजांनी सांगितलं होतं. त्यानंतर राज्यात वाद वाढला आहे.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ठाकरे सरकारनं इंदुरीकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. इंदुरीकर आपल्या वक्तव्यामुळं राज्यात अंधश्रद्धा पसरवत आहेत.राज्य सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असं वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत, असं देसाई म्हणाल्या आहेत.
पुढे तृप्ती देसाई म्हणाल्या की , याआधी देखील महाराजांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. परंतु हिम्मत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तरच या सरकारने इंदुरीकरांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा.अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे, असं जनतेला वाटेल, असंही देसाई म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App