भारताचा तिरंगा आणि मराठीचा झेंडा; फडणवीसांनी शेअर केला जपान दौऱ्याच्या पहिल्या दिवसाचा अनुभव


प्रतिनिधी

मुंबई : भारताचा तिरंगा आणि मराठ्याचा झेंडा जपानमध्ये मुंबई पुण्याचे स्मरण असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जपान दौऱ्यातील पहिल्या दिवसाचा अनुभव ट्विटरवर शेअर केला.India and flag of Marathi; Fadnavis shared the experience of the first day of Japan tour

देवेंद्र फडणवीस हे स्टेट गेस्ट अर्थात जपानचे शाही पाहुणे म्हणून त्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. सर्वसाधारणपणे कोणत्याही देशाच्या पंतप्रधान अथवा राष्ट्रपतींनाच दुसऱ्या देशाच्या शाही पाहुण्यांचा सन्मान मिळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2013 मध्ये जपानने स्टेट गेस्ट म्हणजेच शाही पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान सरकारने असा सन्मान केला आहे.जपानची राजधानी टोकियो मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे तिथल्या भारतीय नागरिकांनी मराठमोळे स्वागत केले.

फडणवीस यांनी आज जपानची आधुनिक राजधानी टोकियो ते जपान मधले तीर्थस्थळ आणि प्राचीन राजधानी क्योटा दरम्यान बुलेट ट्रेनने प्रवास केला. भारतातल्या काशी तीर्थक्षेत्राला जे धार्मिक अध्यात्मिक महत्त्व आहे, तसेच जपानमध्ये क्योटो या शहराला धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. पंतप्रधान मोदींनी तिथले पंतप्रधान शिंजो आबे यांच्या समवेत क्योटोचा दौरा केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी क्योटोचा दौरा केला आहे.

देवेंद्र फडणवीसांचे ट्विट :

भारताचा तिरंगा आणि मराठीचा झेंडा ! – जपानमध्ये मुंबई-पुण्याचे स्मरण, ‘जय भवानी-जय शिवाजी’चा गजर – ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’… गीताने स्वागत

  •  विद्यमान राजधानी (टोकियो) ते प्राचीन राजधानी (क्योटो) असा बुलेट ट्रेनने प्रवास
  •  जपानी गुंतवणूक, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुविधा इत्यादींबाबत चर्चा
  •  नवी मुंबई विमानतळ सुरु होताच जपानसाठी अधिकची उड्डाणे : देवेंद्र फडणवीस

@Dev_Fadnavis
@IndianEmbTokyo
#MaharashtraInJapan #Japan #Tokyo #IndiaJapan #Maharashtra #DFinJapan

India and flag of Marathi; Fadnavis shared the experience of the first day of Japan tour

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात