टी-२० विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्याशिवाय भारताचे सर्व फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. भारत-पाकिस्तान यांच्यातील या हायव्होल्टेज सामन्यावर जगभरातील चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, कोणत्या 5 कारणांमुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. IND Vs PAK team india lost against pakistan due to these 5 reasons know in detail
विशेष प्रतिनिधी
मुंबई : टी-२० विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्याशिवाय भारताचे सर्व फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. भारत-पाकिस्तान यांच्यातील या हायव्होल्टेज सामन्यावर जगभरातील चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, कोणत्या 5 कारणांमुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
भारताकडून सलामीला आलेला रोहित शर्मा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यामुळे संघाची सुरुवात खराब झाली. त्याच्या व्यतिरिक्त केएल राहुलदेखील केवळ 3 धावांचे योगदान देऊ शकला. दोन्ही सलामीवीरांच्या खराब फलंदाजीचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला.
या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या जागी रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठवले, ज्यामुळे संघाच्या धावांचा वेग कमी झाला. जडेजा केवळ 13 धावांचे योगदान देऊ शकला. हार्दिक पांड्या क्रीझवर आला तेव्हा त्याच्यावर वेगवान धावा करण्याचे दडपण होते. झटपट धावा काढण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली.
या सामन्यात टीम इंडियाला सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवली. हार्दिक पांड्याने फिटनेसमुळे गोलंदाजी केली नाही आणि हेदेखील टीम इंडियाला सामना गमावण्याचे एक कारण होते. संघात सहावा गोलंदाज असता तर कदाचित सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते.
या सामन्यात मैदानावर पडलेले दव देखील महत्त्वाचा घटक होता, ज्याचा फायदा पाकिस्तान संघाला झाला. या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज संघर्ष करताना दिसले. सामन्यातील नाणेफेक गमावणे हादेखील विराट कोहलीसाठी मोठा धक्का होता.
टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नाही. भारताविरुद्ध फिरकी गोलंदाजी पाकिस्तानविरुद्ध पूर्णपणे अपयशी ठरली. अशा स्थितीत कोहलीचा हा निर्णयही खूपच आश्चर्यकारक होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App