वृत्तसंस्था
मुंबई : आयकर विभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. त्यामध्ये गुजरात येथील वापी या भागात शाह पेपर मिलवर कारवाई केली. सुमारे 350 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप या मिलवर आहे Income Tax Department raids in Mumbai, Vapi
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने गुजरातमधील वापी आणि मुंबईतील शाह पेपर मिल जवळील १८ जागांवर छापेमारी केली आहे. यामध्ये त्यांना २ करोड रोख रक्कम आणि तितक्याच रक्कमेचे दागिने हाती लागले आहेत.
या कंपनीवर जवळपास ३५० करोड पेक्षा अधिक कर चोरीचा आरोप आहे. तसेच या कंपनीवर गेल्या ५ ते ६ वर्षांपासून गैर व्यवहार आणि कर चोरीचा आरोप आहे. आयकर विभागाचा तपास पूर्ण झाल्यावर योग्य रक्कम समोर येईल, अशी माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App