पुर्ववैमनस्यातून सराईत गुंडाचा पुण्यात खून

सराईत गुन्हेगार येरवडा कारागृहातून जामीनावर बाहेर आला असताना, त्याचा एका टाेळक्याने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लाकडी दांडके व दगडाने ठेचून खून केल्याची घटना वानवडी परिसरात घडली आहे


विशेष प्रतिनिधी

पुणे -सराईत गुन्हेगार येरवडा कारागृहातून जामीनावर बाहेर आला असताना, त्याचा एका टाेळक्याने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लाकडी दांडके व दगडाने ठेचून खून केल्याची घटना वानवडी परिसरात घडली आहे. सनी हिवाळे असे खून झालेल्या आराेपीचे नाव आहे. In wanwadi area criminal background sunny hiwale murder by one gang yesterday night

मयत इसम सनी हिवाळे हा पाेलीसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विराेधात हडपसर, वानवडी पाेलीस ठाण्याचे हद्दीत गंभीर गुन्हे दाखल आहे. माेक्काच्या गुन्हयात ताे येरवडा कारागृहात कैद हाेता परंतु नऊ एप्रिल राेजी ताे कारागृहातून जामीनावर बाहेर आला हाेता. ही बाब हेरुन पूर्ववैमनस्यातून आठ ते नऊ जणांच्या टाेळक्याने मंगळवारी रात्री त्याला काळेपडळ वस्ती भागातील म्हाेसबा चाैक याठिकाणी गाठले.

त्यावेळी हिवाळे व त्याचा मित्र साहील इनामदार यांना आराेपींनी बेदम मारहाण केली. हिवाळे याला लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याचा दगडाने ठेचून खून करत आराेपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच, पाेलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी खून झालेल्या मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. सदर गुन्हयात फरार झालेल्या आराेपींचा पाेलीसांनी शाेध सुरु केला आहे. वानवडी पाेलीस याबाबत पुढील तपास करत आहे.

In wanwadi area criminal background sunny hiwale murder by one gang yesterday night

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात