बावनकुळेंनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला असून एक पोस्टही लिहिली आहे.
विशेष प्रतिनिधी
डोंबिवली : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सध्या राज्यभर ‘घर चलो’ अभियान जोरदार सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्याला घराघरात पोहचवण्यासाठी आणि नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. या अभियनास प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान, आज डोंबिवलीमध्ये या अभियानांतर्गत बावनकुळे यांनी एक हटके अनुभव आला. जो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय या घटनेचा व्हिडीओही सोबत दर्शवला आहे. चंद्रशेखऱ बावनकुळेंनी पोस्टमध्ये काय म्हटले? In the Ghar Chalo campaign Chandrasekhar Bawankule had a different experience in Dombivli even a little girl wants Modi
”पिटुकल्या लुभदालाही हवेत मोदीजी! लुभदा तिचं नाव… अगदीच निरागस. या बालिकेने मला मोदीजी हवेत असे म्हटलं…आणि माझ्यासह सारेच तिच्या कुतूहलगंगेत न्हावून निघालो.
मित्रहो, आजचा दिवस अस्सा भारी निघाला. तिचे बोबडे बोल इतके नादमधुर होते की सगळ्यांनाच तिच्या या विलक्षण बुद्धीचातुर्याचा हेवा वाटला. डोंबिवलीच्या फडके रोडवरचा हा मनमोहक क्षण..खूप अपूर्व असाच..!!तर, त्याचे झाले असे… ‘घर चलो अभियान’ डोंबिवलीच्या फडके रस्त्यावर सुरु होते. अतिशय उत्साहात डोंबिवलीकर अभियानात सहभागी झाले होते.. यातच एका दुकानाच्या पायरीवर लुबधा नावाची ही पिटुकली तिच्या आईच्या कडेवरून ही जनसंपर्क यात्रा बघत होती…
पिटुकल्या लुभदालाही हवेत मोदीजी! लुभदा तिचं नाव… अगदीच निरागस. या बालिकेने मला मोदीजी हवेत असे म्हटलं…आणि माझ्यासह सारेच तिच्या कुतूहलगंगेत न्हावून निघालो.मित्रहो, आजचा दिवस अस्सा भारी निघाला. तिचे बोबडे बोल इतके नादमधुर होते की सगळ्यांनाच तिच्या या विलक्षण… pic.twitter.com/R1FoA0DIFa — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) October 29, 2023
पिटुकल्या लुभदालाही हवेत मोदीजी!
लुभदा तिचं नाव… अगदीच निरागस. या बालिकेने मला मोदीजी हवेत असे म्हटलं…आणि माझ्यासह सारेच तिच्या कुतूहलगंगेत न्हावून निघालो.मित्रहो, आजचा दिवस अस्सा भारी निघाला.
तिचे बोबडे बोल इतके नादमधुर होते की सगळ्यांनाच तिच्या या विलक्षण… pic.twitter.com/R1FoA0DIFa
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) October 29, 2023
ढोलपथकाच्या तालावर आनंदाने टाळ्या वाजवत होती. लेझीमच्या तालावर बोटाच्या चुटक्या वाजवत होती.. तेथील वातावरणात ती तल्लीन झाली होती.. मी ते दुरूनच न्याहाळत होतो..मधूनच ती मोदीजी मोदीजी असा घोष करत होती. या गर्दीतही या चिमुकलीने माझे लक्ष वेधून घेतले… मी तिच्याजवळ गेलो. तिने माझ्या हातातील माईक ओढून आपल्या छोटुश्या हाती घेतला… मीसुद्धा तिला माझ्या कडेवर घेतले. मी तिला विचारले.. तुला काय हवे.. आणि, आश्चर्य ती मोदीजी म्हणाली..
हा अत्यंत आनंदाचा क्षण अनुभविला. इतक्या लहानग्या बालिकेकाही मोदी नावाच्या भविष्याने मोहित केले. याच कुतूहलात ही यात्रा पुढे निघाली..”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App