वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध हटविले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारची नियमावलीही लागू केली आहे. त्यामुळे, स्पा, सलून आणि जिम पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. In Pune Salons, parlors, spas, gyms will be closed! ; lockdown rules are Changed
पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. त्यामुळे पुण्यात सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यात सलून, पार्लर, स्पा, जिम सुरू करण्याचा निर्णय सुद्धा महापालिकेनं घेतला होता. परंतु, आपण निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून आणि पार्लर बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.
परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्याना लस
पुणे पालिका हद्दीतील शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी स्पेशल ड्राईव्ह आयोजित केला आहे. 220 जणांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.
पुण्यात मंगळवारी 39 जणांचा मृत्यू
दरम्यान, पुण्यात मंगळवारी कोरोनाचे नवे 384 रुग्ण आढळले आहेत. रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. 39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 28 पुण्यातील आणि 11 पुण्याबाहेरील आहेत. मंगळवारी 858 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.सध्या 5518 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App