पीएमआरडीए हद्दीतील तुकडाबंदीचे उल्लंघन करून बेकायदा सदनिकांची खरेदी विक्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने कारवाई करण्यास सुरवात केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील तुकडाबंदीचे उल्लंघन करून बेकायदा सदनिकांची खरेदी विक्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातील चार आणि हवेली तालुक्यातील दोन अशा सहा बांधकाम क्षेत्रांवर थेट दाखल कारवाई करण्यात आली आहे. तर आठ व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. In PMRDA area illegal flats sales and purchasing case, PMRDA take action against six building constructions in Maval and haveli area
जिल्ह्यात तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदा खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका, ग्रामीण पोलिस?अधीक्षक यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. मुद्रांक शुल्क विभागातील अधिकार्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यानुसार कारवाई देखील सुरू असताना तुकडाबंदी कायद्यानुसार संबंधित दस्त तपासणी करून बेकायदा बांधकाम करून सदनिका खरेदी विक्रीचे व्यवहार करणार्यांची तपासणी सुरू करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नगररचना विभागांतर्गत कायद्यानुसार विकसकांनी कुठलची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले. त्यासंदर्भात विकसकांना अनधिकृत बांधकामासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, विकसकांनी कुठलीच दखल न घेता बांधकाम करून बेकायदा सदनिकांची खरेदी विक्री व्यवहार सुरू ठेवल्याने पीएमआरडीएने संबंधित आठ विकसकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App