विशेष प्रतिनिधी
मुंबई : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचे दर ७४ ते ८४ पैशांनी वाढले आहेत, तर डिझेलच्या दरातही ७५ ते ८५ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९६.६७ रुपये प्रति लीटर मिळत आहे.In Mumbai, petrol is priced at Rs 120.51
मुंबईत पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये तर डिझेलचा दर १०४.७७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत ११५.१२ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९९.८३ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १००.९४ रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नव्हती.
या राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे आहे, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. किरकोळ विक्रीचे दर हळूहळू वाढवले जातील, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App