महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचे पुन्हा फुटले पेव; खुर्चीवर नाही, तर निदान पोस्टर्सवर तरी नाव ठेव!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री यांचे पुन्हा फुटले पेव; खुर्चीवर नाही, तर निदान पोस्टर्सवर तरी नाव ठेव!!, असे महाराष्ट्रात पुन्हा घडत आहे. महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात असताना अनेक नेत्यांची नावे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे समर्थक पोस्टर्सवर झळकवत आहेत.In Maharashtra, the future chief minister’s party again;

यामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, छत्रपती संभाजी राजे यांची नावे आघाडीवर आहेत. अजितदादांच्या पुणे आणि दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यात अनेक ठिकाणी त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकली. पंकजा मुंडे सध्या महाराष्ट्राच्या शिवशक्ती दौऱ्यावर आहेत. त्यांचीही ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणूनच पोस्टर्स झळकली आहेत. संभाजी राजे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या समर्थकांनी नाशिक मध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून स्वराज्यच्या पोस्टर्सवर नाव झळकवले.



नियोजित वेळेनुसार विधानसभा निवडणुकीला अजून सव्वा वर्ष शिल्लक आहे तरी देखील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. आपापल्या नेत्यांना कुठलीही खालची पदे कार्यकर्त्यांना मान्य नाहीत. त्यामुळे ते आपल्या नेत्यांचे फोटो भावी मुख्यमंत्री म्हणूनच पोस्टर्सवर झळकावत आहेत.

काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची पोस्टर्स अशीच मध्यंतरी भावी मुख्यमंत्री म्हणून झळकली होती. नानांचे नाव त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून लाडू वर लिहिले होते.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले, अलिकडे आपल्या महाराष्ट्रात एक नवीन फॅड निघालं आहे. अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असे बॅनर लावत असतात. माझ्या कानावर आलंय की, माझेही असे मुख्यमंत्रीपदाबाबत बॅनर लागले आहेत. राज्यात काही ठिकाणी राज ठाकरेंचे बॅनर लागलेत. काही ठिकाणी धनंजय मुंडेंच्या बहीण पंकजा मुंडेंचेही बॅनर लागले.

कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. मागे मुंबईला राष्ट्रवादी भवनाच्या बाहेर माझे, जयंत पाटलांचे आणि सुप्रिया सुळेंचे बॅनर लागले होते. हे काही आम्ही कुणी सांगत नाही. मी त्यांना नेहमी सांगतो की, असं कुणी बॅनरवर भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री लिहिल्याने तसं होत नाही. कुणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर १४५ आमदारांचा ‘जादुई आकडा’ गाठावा लागतो.

१४५ आमदारांचा पाठिंबा मिळविणारा मुख्यमंत्री होतो

ज्या १४५ आमदारांचा पाठिंबा मिळेल तो मुख्यमंत्री होत असतो. मागे उद्धव ठाकरेंनी गाठला, देवेंद्र फडणवीसांनी गाठला आणि आत्ता एकनाथ शिंदेंनी हा आकडा गाठला आणि मुख्यमंत्री झाले, असेही अजित पवारांनी नमूद केले.

अजितदादांनी कार्यकर्त्यांचे हवा काढून त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली, तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत नाही. त्यामुळे पोस्टर्स वरच्या भावी मुख्यमंत्री यांची संख्या कमी न होता ती वाढतच असल्याचे दिसून येते.

In Maharashtra, the future chief minister’s party again;

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात