महाराष्ट्रात 42 – 45 नव्हे, अमित शाहांनी कोल्हापुरातून भाजप – शिवसेना युतीला दिले 48 चे टार्गेट

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी महाराष्ट्र पातळीवरील नेते भाजप – शिवसेना युतीसाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 45 जागा निवडून आणण्याचे टार्गेट ठेवत होते. पण अमित शहा यांनी कोल्हापूर मधल्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात 42 – 45 चे नव्हे, तर महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व 48 जागा निवडून आणण्याचे टार्गेट भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. In Maharashtra, not 42-45, Amit Shah gave a target of 48 to the BJP-Shiv Sena alliance from Kolhapur.

कोल्हापूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघ यातील भाजपच्या शक्तिकेंद्र आणि बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा आज कोल्हापूरमध्ये झाला. या मेळाव्यातून अमित शहा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागा जिंकण्याचे टार्गेट दिले.

आपल्या भाषणात अमित शाह यांनी केंद्रातल्या मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्र आणि स्थानिक पातळीवर केलेल्या सर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. कार्यकर्त्यांना मोदींचा गरीब कल्याणाचा कार्यक्रम प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रात 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 42 जागा शिवसेना – भाजप युतीला मिळाल्या होत्या. मात्र, आता केवळ 42 जागांवर समाधान मानायचे नाही, असे सांगून अमित शाह यांनी सगळ्या 48 जागा जिंकायच्या असल्याचा संकल्प कार्यकर्त्यांना दिला आहे.

महाराष्ट्रातील प्रदेश पातळीवरचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे या आधी आपल्या भाषणांमधून आणि पत्रकार परिषदांमधून महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा निवडून आणण्याचे टार्गेट भाजपने ठेवल्याचे सांगत असत. उरलेले तीन मतदारसंघ कोणते?, हे सांगत नसत. मात्र, आता अमित शाह यांनी हे परिमाणच बदलून टाकले आहे. त्यामुळे बारामती सह 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजयाचे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांना मिळाले आहे. हे टार्गेट भाजपचे कार्यकर्ते कसे पूर्ण करतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय नेत्यांची त्यांना कशी साथ मिळते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

In Maharashtra, not 42-45, Amit Shah gave a target of 48 to the BJP-Shiv Sena alliance from Kolhapur.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात