महाराष्ट्रात भाजप – शिवसेनेचे 48 जागा जिंकण्याचे टार्गेट म्हणजे नेमके काय??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापुरातून भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे 48 लोकसभा जागा जिंकण्याचे टार्गेट महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. याचा नेमका अर्थ काय आहे??, हे विचारण्याचे कारण असे की भाजपने आत्तापर्यंत शत प्रतिशत हा शब्द जरी उच्चारला असला, तरी महाराष्ट्रात शत प्रतिशत जागा जिंकणे हा उद्देश ठेवला नव्हता. आता मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाह यांनी बोलून दाखवल्यामुळे त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ देखील येतो याची निश्चिती भाजपने केली आहे का??, हा प्रश्न आहे!!Amit shah set target of winning all 48 loksabha seats for BJP – shivsena in maharashtra, does this include baramati??

2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले होते हे खरे. सुप्रिया सुळे यांचे मताधिक्यही मोठ्या प्रमाणावर घटविले हेही खरे, पण भाजपला शरद पवारांनी निर्माण केलेला बारामतीचा बालेकिल्ला 2019 पर्यंत तरी जिंकता आला नव्हता ही वस्तुस्थिती आहे.मध्यंतरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील किंवा अगदी चंद्रशेखर बावनकुळे हे तीनही प्रदेश पातळीवरचे नेते महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवत होते. पत्रकार परिषदांमध्ये आणि जाहीर सभांमध्ये ते त्याचा उच्चारही करत होते. पण त्यामुळेच भाजपने आपल्या टार्गेट मधून बारामती मतदारसंघ वगळल्याची चर्चा माध्यमांनी केलीच होती.

पण आता अमित शाह यांनी कोल्हापुरातून भाजपच्या कार्यकर्त्यांना जे टार्गेट दिले आहे, ते सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्याचे आहे. याचा अर्थ बारामतीत देखील भाजप या वेळी ला 2024 मध्ये जोरदार आणि कसून प्रयत्न करणार असा आहे का??, हा प्रश्न आहे.

2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. प्रचंड जाहीर सभाही घेतल्या होत्या. परंतु त्यांनी बारामतीत मतदार संघात सभा घेतलेली नव्हती. याचा मराठी माध्यमांनी त्यावेळी राजकीय अर्थ “मोदी – पवार जवळीक” असा काढला होता. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी हे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप – शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेणार का?? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे!!

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारची स्थापना त्यामध्ये शरद पवारांचा “राजकीय रोल” तसेच त्या सरकारमुळे भाजपला आलेले विविध राजकीय अनुभव, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार घालवताना भाजपने केलेले प्रयत्न याची बरीच मोठी राजकीय पार्श्वभूमी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची संघटनात्मक जबाबदारी केंद्रीय पातळीवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आहे.

या सगळ्याचा राजकीय अर्थ पंतप्रधान मोदी 2024 च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात सिरियसली लक्ष घालणार का?? आणि भाजपला अनुकूल असा परिणाम साधून देणार का??, हा सर्वाधिक कळीचा प्रश्न आहे!! अमित शहा यांनी भाजप – शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपुढे ठेवलेल्या 48 मतदार संघ जिंकण्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा किंबहुना टर्निंग पॉईंट ठरणारा मुद्दा आहे. याचे उत्तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधूनच मिळणार आहे!!

Amit shah set target of winning all 48 loksabha seats for BJP – shivsena in maharashtra, does this include baramati??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात