प्रतिनिधी
बारामती : ग्रामपंचायत निवडणुकीत बारामती तालुक्यात अजित पवार गटाने शरद पवार गटावर मात केल्याचे चित्र उभे राहिले आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलकांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील मोळी पूजन कार्यक्रमाला अजित पवारांना बंदी घातली होती. In Baramati taluka, Ajit Dada’s group has edged over Sharad Pawar’s group
त्यामुळे अजित पवार प्रत्यक्ष कार्यक्रमाला गेले नव्हते त्यामुळे तालुक्यात अजित पवार विरोधी वातावरण असल्याचे भासविण्यात आले, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात मात्र अजित पवार गटाने शरद पवार गटावर मात केल्याने अजितदादांवरील बंदी निष्फळ ठरल्याचे दिसून आले.
बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू आहे. बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे आली आहे. या ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सरळ लढत होती. अजित पवार गटाकडे ग्रामपंचायत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. अजित पवार यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
बारामतीमधील पाच ग्रामपंचायतीचा निकाल आला आहे. म्हसोबानगर, पवईमाळ, पानसरे वाडी, आंबेवाडी आणि भोंडवे वाडी या पाच ग्रामपंचायतीत अजित पवार यांच्या गटाला यश आले आहे.
काटेवाडी ग्रामपंचायतीकडे का आहे लक्ष
बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. तालुक्यातील 1 ग्राम पंचायत बिनविरोध झाली होती. तालुक्यात सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्या काटेवाडी या ग्राम पंचायतीकडे लागले होते. या ठिकाणी अजित पवार यांच्यासमोर भाजपचे आव्हान होते. काटेवाडी ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता राहिली आहे. पण भाजपने देखील मोठे आव्हान उभे केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App