प्रतिनिधी
पुणे : सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ विश्व वारकरी सेनेने गंगासागर येथे घेतली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर सध्या व्हायरल होत आहे. आता या व्हिडीओमुळे वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. Immediately expel Sushma Andharen from Shiv Sena
विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वारक-यांना शपथ देऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याचे म्हटले आहे. आगामी काळात राज्यातील वारकरीदेखील अशी शपथ घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात नवीन संघर्ष बघायला मिळू शकतो.
…तर शिवसेना भवनासमोर महाआरती करणार
सुषमा अंधारेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी याआधी मराठा युवा सेनेनेदेखील केली होती. अंधारे यांचे हिंदुत्व खोटे आहे. त्यांची हकालपट्टी न केल्यास शिवसेना भवनासमोर महाआरती करणार असल्याचा इशारा मराठा युवा सेनेने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App