वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात हजारो दस्तांची नियमबाह्य नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाल्याचे आणि हा काळाबाजार 3 वर्षांपासून सुरु असल्याचे उघड झाले आहे. काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये 250 हूनही अधिक प्रकरणांत नियमबाह्य दस्तनोंदणी झाल्याचे दिसून आले आहे. हजारो दस्तांची शहरात अशा पद्धतीने नोंदणी झाल्याचं अधिकाऱ्यानी सांगितले. Illegal Registration of Thousands of cases in Pune; Black Market exposed
पुण्यातील एका दुय्यम निबंधक कार्यालयात नियमबाह्य जमिनींची तसेच सदनिकांची दस्तनोंदणी झाली होती.याप्रकरणी दुय्यम निबंधकाला निलंबित केले होते.पण हे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोचल्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. पुणे शहरात हजारो दस्त नियमबाह्य पद्धतीने नोंदणी केल्याचं उघड झाले आहे.काही कार्यालयांमध्ये 250 हूनही अधिक प्रकरण उघडकीस आली आहेत.
नियम धाब्यावर बसवून नोंदणी
महारेराच्या नियमांना डावलणं, तुकडाबंदी असतानाही दस्तनोंदणी करणं अशा विविध नियमांना धाब्यावर बसवून दस्तांची नोंदणी केल्याचे तपासात समोर आले आहे.
हजारो दस्तांची नोंदणी नियमबाह्य
बांधकाम प्रकल्पातील सदनिका किंवा दुकाने यांची नोंदणी करताना, संबंधित दस्तांत महारेरा नोंदणी क्रमांक आहे का? बांधकाम प्रकल्पाला मंजूरी आहे का? सोबत जमिनीचे तुकडे करून जमीन विकली आहे का? अशा विविध मुद्द्यांची पूर्तता केल्यानंतरचं प्रकल्पांची नोंदणी करण्यात येते. पण पुण्यात तीन वर्षांत हजारो दस्तांची नोंदणी नियमबाह्य पद्धतीने केली असल्याचं समोर आलं आहे.
महारेराच्या नियमानुसार…
पाच गुंठ्यांच्या आतील अथवा आठ सदनिकांच्या आतील प्रकल्पांसाठी दस्त नोंदणीची आवश्यकता नाही. पण त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकाम प्रकल्पासाठी महारेराकडे नोंदणी बंधनकारक आहे. पण, पुणे शहरात या नियमांचं उल्लंघन केले आहे. जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करण्यास मनाई आहे. पण, एक-एक गुंठ्यांची दस्तनोंदणी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App