व्यावसायीकला वेठीस धरून 10 टक्के व्याजदराने कर्ज देऊन मुद्दल व व्याज वसूल करून अधिक व्याजाची आकाराणी करत पिळवणूक करणार्या व बेकायदेशीर सावकारी करणार्या सावकाराला अखेर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने बेड्या ठोकल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
पुणे – व्यावसायीकला वेठीस धरून 10 टक्के व्याजदराने कर्ज देऊन मुद्दल व व्याज वसूल करून अधिक व्याजाची आकाराणी करत पिळवणूक करणार्या व बेकायदेशीर सावकारी करणार्या सावकाराला अखेर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने बेड्या ठोकल्या आहेत.Illegal extortion case pune police crime branch unit २ arrested one accused
भरत बाबूलालजी उणेचा (वय-36, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी उणेचा हा अवैधरित्या मासिक 10 टक्के व्याजदराने कर्ज देऊन त्यांचेकडून सुरक्षा ठेव स्वरूपात कर्जदाराच्या सहीचे कोरी चेक, कोरे स्टॅम्प पॅड व इतर महत्वाची कागदपत्रे घेत होता.
कर्जदाराकडून मुद्दल व्याजसहित वसूल करून देखील दमदाटी, जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांची पिळवणूक करीत असल्याची तक्रार युनिट 2 ला मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे व पथकातील अंमलदार तक्रारीची चौकशी करत असताना तक्रारदाराने उणेचा याच्याकडून 2 वर्षापूर्वी 3 लाख रुपये 10 टक्के मासिक व्याजदराने घेतले होते. त्याबदल्यात तक्रारदाराकडून सहीचे 2 कोरे चेक, 1 कोरा 100 रु चा स्टॅम्प पेपर लिहून घेतला होता.
तक्रारदाराने मुद्दल तसेच व्याज अदा करून देखील उणेचा हा त्याचेकडे आणखी अडीच लाख रुपये व्याजाची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास समाजात तुझी बदनामी करतो अशी धमकी तो देत होता.
चौकशीअंती या प्रकरणात उणेचाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर युनिट 2 चे पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, राजेंद्र पाटोळे, पोलिस कर्मचारी संजय जाधव, मोहसीन शेख, साधना ताम्हाणे यांनी त्याला सापळा रचून अटक केली पुढील कायदेशिर कारवाईसाठी उणेचाला दत्तवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App