विशेष प्रतिनिधी
अकोला : उद्या मी भारतीय जनता पक्षासोबत जायचे ठरवले तर मला कोण थांबवू शकतो? मला शरद पवार थांबणार आहेत? उद्धव ठाकरे थांबवणार आहेत? की राहुल गांधी थांबवणार आहेत? मला कोणी थांबवू शकत नाही, माझ्या पक्षाला कोणी थांबवू शकत नाही. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पक्षाची ‘बी टीम’ असा आमचा प्रचार केला जातो. मात्र, आम्ही ठरवले तर कोणासोबतही जाऊ शकतो. आम्हाला कोण थांबवणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.If I decide to go with BJP, who can stop me?; Answer by Prakash Ambedkar; Criticism of Mahavikas Aghadi
वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्रित लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आता कमी झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने 26 तारखेपर्यंत महाविकास आघाडीला वेळ दिला आहे. तोपर्यंत जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेऊन आमच्याशी चर्चा करा, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीमध्ये अजूनही 15 जागांबाबत वाद असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीने बैठका घेतल्या. मात्र, त्या बैठकांना आम्हाला बोलवले गेले नाही. याबाबतच्या बातम्या मीडिया दाखवत नाही. मात्र, आम्ही किती जागा लढवणार? आम्ही किती जागा मागितल्या आहेत? असे प्रश्न आम्हाला विचारत आहे, असा आरोप देखील ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मुंबई तकने दिलेल्या वृत्तानुसार प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीत हा दावा केला आहे. मागील अडीच वर्षापासून महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष आहेत. मात्र अडीच वर्षांमध्ये ते 48 जागा वाटून घेऊ शकले नाहीत. त्यांच्यामध्ये 15 जागांवर वाद आहे. हे मीडियाने विचारले का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. ज्यावेळी त्यांचे ठरले नाही, तेव्हा तुम्ही आम्हाला का आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे अंतर्गत ठरलेले नाही. त्याला आम्ही काय करणार? असे देखील ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App