विशेष प्रतिनिधी
मुबंई : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा विडा जसा किरीट सोमय्यांनी उचलला आहे तसाच आता विडा आता संजय राऊत उचलणार ? नुकताच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना पिंपरी चिंचवडमधील 500 कोटींचा घोटाळा उघडकीस आणावा, यासंबंधीचे एक पत्र पाठवले होते. त्याचप्रमाणे तुमच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी नेते यांना तुरुंगात जावे लागले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्ही ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांना मदत कराल असा विश्वासही व्यक्त करतो. अशा संदर्भाचे एक पत्र संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना पाठवले होते.
I will give the names of 100 leaders in BJP, let’s see if action is taken against them: Sanjay Raut
संजय राऊत यांनी यावेळी भाजपला इशारा दिला आहे की, भाजपमधील 100 भ्रष्ट लोकांची नावे मी देईन. त्यापैकी एक आत्ता किरीट यांना पाठवले आहे. \ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने कारवाई करायला हवी हे त्यातलं पहिलं नाव आहे. अजून 99 नावे पुराव्यांसह देणार आहे. हे त्या 100 जणांच्या यादीतील एक नाव आहे.
संजय राऊत यांच्या पत्राला किरीट सोमय्यांनि काय उत्तर दिले?
आता मी सुरूवात करेन. मला बघायचा आहे की कारवाई होते की नाही. यात सगळे प्रमुख लोक आहेत. सगळे भ्रष्टाचाराच्या गंगेत डुबक्या मारत आहेत. त्या सर्वांची नावे सगळे माझ्याकडे आहेत. मी ती नावे देणार आहे. असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App