ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.‘I think the rhythm is fun, why the members, show me’; Udayan Raje expressed anger
विशेष प्रतिनिधी
सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याला जिल्हा बँकेने कर्ज दिलेले आहे, याप्रकरणीच ईडीची नोटीस बँकेला मिळाली. या प्रकरणाची माहिती बँकेचे संचालक खासदार उदयनराजे भोसले यांनी संचालक मंडळाकडे मागितली मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
उदयनराजे हात जोडून विनंती करत म्हणाले, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा, असे आवाहन करत संचालक मंडळाला त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा, असे आवाहन त्यांनी केले.
ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठं जायचं. परिणामांना मी घाबरत नाही, जे व्हायचंय ते होऊ द्या, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला यावेळी दिला. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. मी शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतोय, असंही उदयनराजेंनी स्पष्ट केले.
यावेळी उदयनराजे म्हणाले, बँक टिकून रहावी असं मला वाटत आहे. मला माहिती आहे की, मी बोलत असताना अनेकांना वाटत असेल की खूप मस्ती आलीय. माझी नका जिरवू, मेहरबानी करा. माझी विनंती आहे. मी तुमचा कोणाचा दुश्मन नाहीये. हात जोडून विनंती करतो. ही बँक शेतकरी आणि शेतकरी सभासदांची आहे. या गोरगरीब शेतकरी सभासदांच्या वतीने विनंती करतो ही बँक राहू द्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App