Corona crisis in Mumbai : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असतानाही मुंबईकरांना त्याची भीतीच उरली नसल्याचे दिसून येत आहे. दादरच्या भाजीमंडईत असलेली अलोट गर्दी लोकं आता पहिल्यासारखे सतर्क नाहीत, हेच दिसून येते. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळत आहेत. मुंबईत दररोज रुग्णसंख्येचे नवनवे रेकॉर्ड मोडले जात आहेत. तरीही लोकांनी कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून खरेदीला प्राधान्य दिले आहे. मागच्या 24 तासांत एकट्या मुंबईत 8,938 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 23 मृत्यू झाले आहेत. huge crowd gathered in Dadar’s vegetable market amid Corona crisis in Mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असतानाही मुंबईकरांना त्याची भीतीच उरली नसल्याचे दिसून येत आहे. दादरच्या भाजीमंडईत असलेली अलोट गर्दी लोकं आता पहिल्यासारखे सतर्क नाहीत, हेच दिसून येते. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळत आहेत. मुंबईत दररोज रुग्णसंख्येचे नवनवे रेकॉर्ड मोडले जात आहेत. तरीही लोकांनी कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून खरेदीला प्राधान्य दिले आहे. मागच्या 24 तासांत एकट्या मुंबईत 8,938 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 23 मृत्यू झाले आहेत.
Maharashtra: Crowd seen at Dadar Vegetable Market in Mumbai this morning. Mumbai reported 8,938 new #COVID19 cases & 23 deaths yesterday. pic.twitter.com/WAcDsWBmU5 — ANI (@ANI) April 9, 2021
Maharashtra: Crowd seen at Dadar Vegetable Market in Mumbai this morning.
Mumbai reported 8,938 new #COVID19 cases & 23 deaths yesterday. pic.twitter.com/WAcDsWBmU5
— ANI (@ANI) April 9, 2021
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 56286 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात 36130 जण बरे होऊ घरी गेले आहेत. सध्या राज्यात 5,21,317 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 26,49,757 रुग्ण बरे झालेले आहेत. तर 57,028 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 32,29,547 पर्यंत पोहोचली आहे.
#WATCH | Mumbai: Thin crowd at Byculla vegetable market this morning as police security tightens amid surge in #COVID19 cases pic.twitter.com/78OXnSIFP9 — ANI (@ANI) April 8, 2021
#WATCH | Mumbai: Thin crowd at Byculla vegetable market this morning as police security tightens amid surge in #COVID19 cases pic.twitter.com/78OXnSIFP9
— ANI (@ANI) April 8, 2021
कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच नवी कोरोना गाइडलाइन जारी केली आहे. यानुसार शहरात अनेक ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. याद्वारे कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्याची प्रशासनाची अपेक्षा आहे.
huge crowd gathered in Dadar’s vegetable market amid Corona crisis in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App