सगळं द्या द्या कसं, आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील १० रुपये टॅक्स कमी करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकर, अजित पवार यांना असे वाटते की सर्व काही केंद्र सरकारने करावे. राज्याने आधी पेट्रोल-डिझेलवरी १० रुपये टॅक्स कमी करावा, मग केंद्राने ५ रुपये कमी करण्याची मागणी करावी,असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडी सरकारला दिला.How to give everything, first you reduce the tax on petrol and diesel by Rs 10, Chandrakant Patil advises Maharashtra government
प्रतिनिधी
पुणे : सगळं द्या द्या कसं, आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील १० रुपये टॅक्स कमी करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकर, अजित पवार यांना असे वाटते की सर्वर् काही केंद्र सरकारने करावे.
राज्याने आधी पेट्रोल-डिझेलवरी १० रुपये टॅक्स कमी करावा, मग केंद्राने ५ रुपये कमी करण्याची मागणी करावी,असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, पेट्रोल-डिझेलवरील किंमती कमी करण्याचे राज्याच्याही हातात आहेत. त्यामुळे राज्यानेही टॅक्स कमी करावा. एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर बोलताना पाटील म्हणाले, नाथाभाऊ आमचे नेते आहेत.
तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरे बोलावे. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केले नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकले. हे म्हणण्याने काही वस्तुस्थिती बदलत नाही.
आम्हाला धोका दिला गेला, फसवले गेले याचे दु:ख आहे. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही.भाजपमध्ये मतभेद नाहीत आणि असतील तरी ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमच्यामध्ये पक्ष सोडल्यावर मारण्याची पद्धत नाही. जो पक्ष सोडून जाईल तो आहे तिथे सुखी रहा, अशी आमची पद्धत आह.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App