विशेष प्रतिनिधी
पुणे :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय देवेंद्र शहा यांच्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील बडी दूध डेअरी असलेल्या प्रयाग मिल्क फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे तब्बल 428 कोटींचे बनावट व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.Home Minister Dilip Walse Patil’s close aide Devendra Shah’s Parag Milk Foods Pvt Ltd bogus deal of Rs 428 crore?
प्राप्तिकर विभागाकडून मागील चार पाच दिवस सुरू असलेल्या छापासत्रात झालेल्या तपासणीमध्ये ही बाब समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. डेअरीचे प्रमुख देवेंद्र शहा यांची तब्बल 2 कोटी 55 लाख रुपयांची मालमत्ता देखील प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे.
येत्या दोन महिन्यांमध्ये पन्नास कोटी रुपयांचा कर भरणार असल्याचा आश्वासन शहा यांनी प्राप्तिकर विभागाला दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निकटवर्तीय असलेले आणि वळसे पाटील यांचे कौटुंबिक मित्र असलेल्या शहा यांच्यावर प्राप्तीकर विभागाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
प्राप्तिकर विभागाने 25 नोव्हेंबर रोजी डेअरीशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. देशभर प्रसिद्ध असलेल्या या डेअरीच्या विविध कार्यालये आणि केंद्रांवर छापे टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या डेअरीचे डेरीचे आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचं प्राप्तिकर विभागाला आढळून आले होते. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या चार पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली.
प्राप्तिकर विभागाचे एका पथकाने गुरुवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास मंचर येथील कार्यालयावर छापा टाकला होता. तर दुसऱ्या पथकाने त्याच दिवशी पहाटे साडेतीनच्या सुमारास अवसरी छापा टाकला. तर, तिसऱ्या पथकाने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास थेट डेअरीचे मालक देवेंद्र शहा यांच्या घरीच धाड मारली.
तर चौथा छापा शहा यांच्या एका मित्राच्या घरी टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल पाच दिवस चाललेल्या या तपासणीमध्ये डेअरी मधून बनावट बिले आणि बोगस खरेदी दाखविण्यात आल्याचे समोर आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App