New proposal for Police Department : राज्य पोलीस दलासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या गृहविभागात एका नवीन प्रस्तावावर काम सुरू आहे. यानुसार राज्य पोलीस दाखल झालेल्या पोलीस शिपाईसुद्धा पीएसआय होऊ शकणार आहे. या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रस्तावानुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. गृहमंत्रालयातर्फे अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत ट्विट करण्यात आलं आहे. home minister Dilip Walse Patil New proposal for Police Department Now Police shipayi can also become PSI Till retirement
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य पोलीस दलासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या गृहविभागात एका नवीन प्रस्तावावर काम सुरू आहे. यानुसार राज्य पोलीस दाखल झालेल्या पोलीस शिपाईसुद्धा पीएसआय होऊ शकणार आहे. या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रस्तावानुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. गृहमंत्रालयातर्फे अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत ट्विट करण्यात आलं आहे.
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. — HMO Maharashtra (@maharashtra_hmo) July 3, 2021
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) July 3, 2021
या ट्वीटनुसार, पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
असा निर्णय झाला तर पोलीस शिपाई म्हणून भरती झालेली व्यक्ती निवृत्त होईपर्यंत पीएसआय पदापर्यंत जाऊ शकणार आहे. यात पदाची संख्या, आरक्षण, पात्रता असे निकष प्रमोशनसाठी लागू होतील. तथापि, याचबरोबर निवृत्तीपर्यंत पीएसआय होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठीच गृहविभागातर्फे प्रस्तावावर काम सुरू आहे.
5 आणि 6 जुलै रोजी राज्याचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन होऊ घातलं आहे. कोरोनाचा हवाला देऊन केवळ दोनच दिवसांत अधिवेशन गुंडाळण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मानस आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे.
home minister Dilip Walse Patil New proposal for Police Department Now Police shipayi can also become PSI Till retirement
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App