हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना १०८ रुग्णवाहिकेसाठी दोन तास ताटकळत थांबावे लागत असल्याने शिवसेनेचे आमदार संतोष बांगर रुग्णवाहिका व्यवस्थापनावर चांगलेच भडकले कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल .
विशेष प्रतिनिधी
हिंगोली : मिळण्यास दोन तास उशीर झाल्यामुळे हिंगोलीतील शिवसेना आमदाराचा संताप झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार संतोष बांगर यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. २० मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन असे ते म्हणतं आहेत . Hingoli Kalamnuri Shivsena MLA Santosh Bangar alleged Call Recording Audio Viral
आपल्या मतदारसंघातील नागरिकांना रेमडिसीवीर इंजेक्शनचा साठा मिळावा, यासाठी त्यांनी आपली ९० लाखांची एफडी मोडली होती . आज त्यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, सरकारी १०८ रूग्णवाहिका वेळेत हजर न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, संबंधित फोनवरील व्यक्तीला, २० मिनिटांत गाडी हजर न झाल्यास पेट्रोल टाकून फुकून देईल, असेही ते या फोन संभाषणात म्हटल्याचे दिसून येते.
काय म्हणाले बांगर-
संतोष बांगर : लय बोर व्हायले बघा मी, इमानदारीने… तुम्हाला खोटं सांगत नाही मी.. एकही गाडी १०८ ची चालू देणार नाही… मी सांगतो उभ्या गाडीत रॉकेल टाकून फुकून देईन…
जिल्हा परिषद अध्यक्षांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे नेण्यासाठी १०८ नंबरवरील अॅम्ब्युलन्सला पाचारण करण्यात आले होते.अॅम्ब्युलन्स वेळेवर न आल्याने संतोष बांगर चांगलेच संतापले होते . दरम्यान आमदारांच्या या इशाऱ्यानंतर तातडीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाची बेले यांना रुग्णवाहिका पाठवून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
रेमडीसीवीरसाठी मोडली ९० लाखांची एफडी
दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वीच आपली ९० लाखांची एफडी मोडून रेमडीसीवीर इंजेक्शनची मागणी केली होती. आपल्या मतदारसंघातील नागरिकांचं जीवन वाचवण्याला प्राधान्य देण्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तसेच, एका रुग्णाने रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी आमदार बांगर यांना फोन केला होता.
आपल्या आईची तब्येत खालावली असून ती सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. डॉक्टरांनी रेमेडीसीवीर इंजेक्शनची मागणी केलीय, असे म्हणत रडत असलेल्या मुलाला धीर दिला. त्यानंतर, त्या रुग्णालयात २ रेमडीसीवीर इंजेक्शनची सोयही त्यांनी करुन दिली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App