घरातील पीठ संपल्याने दुचाकीहून पीठ आणण्यासाठी गेलेल्या पीता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या बसची धडक बसली. यात वडील बसखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी रात्री पुणे-सोलापुर मार्गावर यवत येथे घडला.
विशेष प्रतिनिधी
पुणे –घरातील पीठ संपल्याने दुचाकीहून पीठ आणण्यासाठी गेलेल्या पीता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या बसची धडक बसली. यात वडील बसखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी रात्री पुणे-सोलापुर मार्गावर यवत येथे घडला.High speed Pmpml bus dash two wheelar, one dead in yavat
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात गजानन नलेगावकर (वय -५६) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा आदर्श नलेगावकर गंभीर जखमी झाला. हे दोघे गुरुवारी रात्री पीठ आणण्यासाठी जात होते. पुणे सोलापूर मार्गावर पीएमपीएमएल बस मुख्य महामार्गावरून सेवा रस्त्यावर वळत असताना त्यांच्या दुचाकीला धडकली.
यात गजानन नेलगावकर हे बस खाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर आदर्श हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पिता पुत्र यांची परिस्थीती हलाखीची आहे. घरातील मुख्य व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App