फडणवीसांच्या कार्यक्षमतेचा हा घ्या पुरावा; 11 महिन्यांत केल्या 1,14,414 स्वाक्षऱ्या!!

प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्रात काही विशिष्ट नेते खूप “कार्यक्षम” आहेत. त्यांची प्रशासनावर खूप “पकड” आहे, वगैरे बोलबाला मराठी माध्यमे नेहमी करत असतात. त्यांना विशिष्ट नेत्यांच्या पलीकडे बाकी कोणी फारसे “कार्यक्षम” दिसत नाही. पण अशा “कार्यक्षम” नेत्यांच्याही पलीकडे अशी काही व्यक्तिमत्वे आहेत, की जी न बोलता काम करतात आणि आपला महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन ठसा उमटवू शकतात. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस!! Here’s proof of Fadnavis’ efficiency; 1,14,414 signatures done in 11 months

फडणवीसांची पाच वर्षांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द पुरेशी बोलकी आहेच, पण आता राजकीय परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे लागत असताना फडणवीसंनी आपली मूळ कार्यक्षमता बिलकुलच घटू दिलेली नाही. हे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.

माहिती अधिकारातून आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज येणाऱ्या निवेदनावर 347 स्वाक्षऱ्या करत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये 1,14,414 स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारामध्ये ही माहिती मागितली होती. त्यांनी मिळविलेल्या माहितीनुसार, 30 जून 2022 पासून 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 1.14 लाख निवेदनांचा निपटारा केला आहे. यामध्ये व्हीआयपी पत्रव्यवहारांची संख्या 32,508 आहे, तर यामध्ये जनरल पत्रांची संख्या 74,703 आहे. म्हणजेच दर महिन्याला फडणवीस यांनी  सरासरी 10,402 निवेदनांवर स्वाक्षऱ्या केल्या. याचा अर्थ फडणवीस सरासरी दर दिवसाला 347 निवेदनांवर स्वाक्षऱ्या करतात, असा होतो.



निवेदने फडणवीसांपर्यंत कशी पोहचतात?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार्‍या प्रत्येक निवेदनावर ते स्वत: स्वाक्षरी करतात. तसेच त्या निवेदनाचे पुढे काय करायचे याचा शेरा देखील ते निवेदनावर लिहितात. त्यानंतर ते निवेदन त्यांच्या कार्यालयामार्फत  संबंधित विभागाकडे सुपूर्त करण्यात येते. पण हे निवेदन  संबंधित खात्याकडे जाण्यापूर्वी त्यावर एक युनिक नंबर टाकण्यात येतो. त्याची डिजीटल प्रत ही फडणवीसांच्या कार्यालयात ठेवली जाते. यामुळे त्या निवेदनाचा संबंधित विभागाकडे पाठपुरवठा करण्यास सोपे जाते.

मुख्यमंत्री असल्यापासूनची पद्धत

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून ते हीच पद्धत वापरत असल्याचे देखील या माहिती अधिकारामधून समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाणाऱ्या  प्रत्येक कागदाचा तपशील हा कधीही पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. तसेच अगदी नावाने सुद्धा फडणवीसांच्या कार्यालयात त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. इतकेच नाही तर ई-ऑफिसमध्ये तुमचे निवेदन ज्या विभागाकडे गेले, ते कोणत्या अधिकार्‍याकडे आहे आणि त्यावर आतापर्यंत काय काय कारवाई झाली या संदर्भातली सर्व माहिती तात्काळ उपलब्ध होते.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक सॉफ्टवेअर विकसित केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरील काम अगदी सोप्या पद्धतीने करता येते. त्यामुळे  प्रत्येक कागदाचा संपूर्ण तपशील अगदी सहज मिळवता येतो. आता हेच सॉफ्टवेअर ते उपमुख्यमंत्री म्हणून वापरत आहेत.

Here’s proof of Fadnavis’ efficiency; 1,14,414 signatures done in 11 months

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात