पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई

विशेष प्रतिनिधी

यवत : दौंड तालुक्यातील यवत येथे गुटखा अड्ड्यावर छापा मारून तब्बल १७ लाख ४४ हजार ४४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत यवत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Gutkha worth Rs 17 lakh in Pune district Caught; Police action at Yavat

क्रांती बारवकर (अन्न व औषध प्रशासन अधिकारी,पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राजेंद्र गणपत मलभारे व राहुल राजेंद्र मलभारे (रा.दोघेही मलभारे वस्ती,यवत ता.दौंड) या दोन आरोपींनी त्यांच्या ताब्यातील महिंद्रा बोलोरो पिकअप कार क्र.४२,एक्यु ४९३० यामध्ये गुटखा आणि सुगंधी पानमसाला मालाचा साठा हा विक्री करण्याच्या उद्देशाने वरील वाहनात साठवणूक करून ठेवण्यात आल्याचे या पथकाने मारलेल्या छाप्यात निदर्शनास आले.



अन्न व औषध प्रशासनाच्या या छाप्यात केसरयुक्त विमल पान मसाला,व्ही वन सुगंधित तंबाखू पॅकेट्स,केसरयुक्त विमल,पान मसाला,व्ही वन सुवासिक,तंबाकू,केसरयुक्त विमल पानमसाला (हिरवा) सुगंधीत तंबाखुचे पॅकेट्स,राज इलायची सुगंधित तुबाखुचे व ७,००,०००/- रुपये किमतीची महिंद्रा बोलोरो पिक अप असा १७,४४,४४०/ रू किमतीचा मुद्देमाल पकडण्यात आला असून आरोपींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gutkha worth Rs 17 lakh in Pune district Caught; Police action at Yavat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात