गुंठेवारी नियमीतीकरण; ३० जूनपर्यंत मुदतवाढ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गुंठेवारी नियमीतीकरणास आता नव्याने ३० जुनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी मुदतवाढ देऊनही तांत्रिक कारणांमुळे हजारो मिळकतींची गुंठेवारी होऊ शकली नव्हती. अद्याप अनेक गुंठेवारी क्षेत्राचे नियमितीकरण प्रलंबित आहे. त्यामुळे या अधिनियमाला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. Gunthewari regularization; Extension till June 30

राज्य सरकारने ऑगस्ट २००१ मध्ये गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा लागू केला. एक जानेवारी २००१ पूर्वी झालेल्या गुंठेवारी योजनांना त्याचा लाभ देण्यात आला. त्यामुळे राज्यातील बरेच गुंठेवारी क्षेत्र नियमित झाले. राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे गुंठेवारी नियमित करण्याचा अधिनियम एकमताने मान्य केला.



मात्र या संदर्भात ऑक्टोबर २०२१ मध्ये राज्य शासनाने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीनुसार गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचे आदेश काढले. बहुतांश गावांमध्ये गुंठेवारी मध्ये झालेली बांधकामे ९ मीटरच्या आतील रस्त्यांवर आहेत. त्यामुळे नियमीतीकरणासाठी खूप कमी प्रस्ताव दाखल झाले.

Gunthewari regularization; Extension till June 30

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात