ST Bank : गुणरत्न सदावर्तेंचे पुन्हा पवारांना आव्हान; आता एसटी बँकेची निवडणूक लढवणार!!


प्रतिनिधी

मुंबई : एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एसटीच्या कामगारांचा 5 महिने संप केल्यानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आता एसटीच्या बँकेची निवडणूक टार्गेट केली आहे. याकरता सदावर्ते स्वतःचे पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहेत. Gunaratna Sadavarten challenges Pawar again; Now ST Bank will contest the election

सदावर्ते स्वतःचे पॅनल उभारणार 

वकील गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिल रोजी जामिनावर बाहेर पडले. त्यानंतर ते आता पुन्हा एसटीच्या कामगारांसाठी सक्रिय झाले आहेत. मात्र ही भूमिका ते आंदोलनातून मांडणार की नवी राजकीय कारकीर्द सुरु करणार हे मात्र स्पष्ट नव्हते. गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहेत. सदावर्ते हे एसटी बँकेच्या निवडणुकीत आपले स्वतःचे पॅनल उभे करणार आहेत. तशी तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे. एसटी बँकेचे राज्यात तब्बल 90 हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकले असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार नक्कीच वेगळी जादू करतील, अशी शक्यता वर्तवली आहे.

2 हजार कोटींहून अधिक ठेवी 

गुणरत्न सदावर्ते यांनी संपात सहभागी असताना कायम आपल्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच ठेवले होते. शिवाय शरद पवार यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान केले, जाणीवपूर्वक तेच विलिनीकरण टाळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेताना सदावर्ते दिसणार आहेत. तब्बल 2 हजार कोटींहून अधिक ठेवी असलेल्या एसटी बँकेच्या राज्यात 50 शाखा आहेत. सध्या या बँकेचे 90 हजार सदस्य आहेत.

Gunaratna Sadavarten challenges Pawar again; Now ST Bank will contest the election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात