खास पत्र शेअर करत आठवणींना उजाळा
विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी चित्रपट विश्वातील सुप्रसिद्ध गीतकार कवी नादो महानोर यांचं निधन झाल्याने संपूर्ण चित्रपट विश्वावर एक शोककळा पसरली आहे. Great Marathi poet ND Mahanor tribute.
आपल्या समृद्ध अशा शब्द श्रीमंतीने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले महानोरांचीं गाणी येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या मनात रुंजी घालतील.जैत रै जैत, अजिंठा, एक होता विदूषक, मुक्ता आणि सर्जा या चित्रपटातून गीतलेखन करत आपल्या प्रतिभेचा अद्भुत अविष्कार महानोर यांनी सादर केला होता. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते साहित्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिकेतून कार्यरत होते. कधी कवी, लेखक म्हणून तर कधी गीतकार अशा भूमिकांनी चाहत्यांना, वाचकांना त्यांनी निखळ आनंद दिला.
मनोरंजन जाण्याने कला राजकारण समाजकारण या विश्वातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या क्षेत्रातील अनेकांनी आपल्या शब्दात महानोर्यांना आदरांजली अर्पण करत शोकं व्यक्त केला.यासगळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे, वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज यांनी त्या पोस्टमधून महानोर यांच्या प्रती भावना व्यक्त करताना त्यांच्या काही आठवणींना उजाळाही दिला आहे.
राज म्हणतात की, ना.धो. महानोर यांचं आज निधन झालं. बहिणाबाई चौधरी आणि बालकवी यांच्या कवितेचा वारसा ना.धों.नी समृद्ध केला. ना.धो. महानोरांनी महाराष्ट्राचं निसर्गभान जागृत केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ ही आणि अशी अनेक ना.धों. महानोरांची गीतं महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.
२०१९ ला माझ्या एका भाषणानंतर ना.धो. नी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जे लिहिलं होतं, ती माझ्या आयुष्यात मला मिळालेली मोठी पोचपावती. ना.धो. महानोरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. अशा शब्दांत राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App