नूह मध्ये घुसखोर रोहिंग्यांच्या 200 बेकायदा झोपड्या बुलडोजर कारवाईत उद्ध्वस्त!!


प्रतिनिधी

नूह : हरियाणातील दंगलग्रस्त नूह भागात राज्य सरकारने बुलडोझर कारवाई करून घुसखोर रोहिंग्यांच्या 200 बेकायदेशीर झोपडपट्ट्या पाडून टाकल्या. या झोपड्यांमध्ये नूहच्या हिंसाचारात सामील असणारे आणि दगडफेक करणारे घुसखोर रोहिंग्या आरोपी राहत होते, अशी पोलिसांची माहिती आहे. यापैकी अनेकजण अवैध स्थलांतरित होते. 200 illegal huts of Rohingya infiltrators destroyed in a bulldozer operation in Nuh

या घुसखोर रोहिंग्यांनी तावडू भागात मोहम्मद पुरा रोडवर सरकारी जमिनीवर कब्जा करून 200 झोपड्या उभारल्या होत्या. हरियाणा सरकारने या झोपड्यांवर बुलडोझर चालवला. त्यातील अनेकांवर नूह हिंसाचारात सामील झाल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आले होते. दगडफेकीसाठी वापरल्या जाणार्‍या घरांसाठीही अशीच कारवाई करण्याचे नियोजन आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशाच्या धरतीवर हरियाणा देखील बुलडोझर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार पोलिसांच्या प्रचंड फौज फाट्यासह तावडूच्या मोहम्मद पुरा भागात जाऊन सरकारी यंत्रणांनी बेकायदा झोपड्यांवर बुलडोजर चालवत त्या उद्ध्वस्त केल्या.

200 illegal huts of Rohingya infiltrators destroyed in a bulldozer operation in Nuh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात