प्रतिनिधी
मुंबई : येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत असून, सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी पगार आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. Govt employees salary before Diwali
एरवी ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी २२ ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी आणि इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती देण्यात आली.
PMGKAY Scheme : केंद्र सरकारची सणांची भेट; मोफत रेशन योजनेला मुदतवाढ
कोणाकोणाला मिळणार लाभ?
या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल. वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App