गोविंद बागेतली दिवाळी पूर्वार्धात न आलेल्या अजितदादांभोवती फिरली; उत्तरार्धात शरद पवारांच्या जातीच्या चर्चेभोवती फिरली!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : बारामतीतल्या गोविंद बागेतल्या दिवाळीचा पूर्वार्ध तिथे न गेलेल्या अजितदादांभोवती फिरला, तर उत्तरार्ध शरद पवारांच्या जातीभोवती फिरला!!, दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी हे घडले.Govind baugh diwali : first phase discussion on ajit pawar and 2nd phase discussion on sharad pawar’s caste

कारण गोविंद बागेतल्या सुप्रसिद्ध दिवाळीत आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. त्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्धा ग्लास भरलेला आहे हे मानावे लागते. वास्तवात जगावे लागते, असे वक्तव्य केले. शरद पवारांनी मात्र पत्रकार परिषदेत अजित पवारांचे नाव घेणे टाळले. कुणाची काही कामे असतात. आजारपणे असतात. पण इथे आलेल्या लोकांमध्ये काही कमतरता आहे का??, असा सवाल त्यांनी बारामतीतल्याच पत्रकारांना केला.



पण त्याच वेळी शरद पवारांनी आपल्या जातीच्या मुद्द्यावर देखील प्रत्युत्तर दिले. माझी जात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण मी जातीचे राजकारण कधी केले नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी केले आणि त्याच मुद्द्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर पवारांच्या ओबीसी जातीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या नामदेव जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा पवारांवर ते ओबीसीच असल्याचा आरोप केला. पवारांचे समर्थक दाखवत असलेले पवारांचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देखील खोटे आहे. कारण महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ 1966 मध्ये अस्तित्वात आले, मग शरद पवारांचे 1958 चे सर्टिफिकेट खरे कसे??, असा सवाल नामदेव जाधव यांनी उपस्थित केला. मूळात मुद्दा 23 मार्च 1994 च्या जीआर चा आहे कारण त्या जीआर मुळे मराठ्यांचे आरक्षण गेले. ते आरक्षण तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी घालवले. त्यांनी जीआर मध्ये फेरफार केले म्हणून मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण गेले. कारण स्वतः पवार मराठा म्हणून गेली 50 वर्षे सार्वजनिक जीवनात वावरले, पण प्रत्यक्षात ते ओबीसीच नेते आहेत, असा आरोप जाधव यांनी पुन्हा केला.

शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातच स्वतःची जात ओबीसी अशी लिहिली आहे. वन इंडिया नावाच्या वेबसाईटवर त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आता त्यावर कोणाचा आक्षेप असेल तर त्यांनी तो निवडणूक आयोग किंवा संबंधित ॲथॉरिटीकडे नोंदवला पाहिजे. पण जोपर्यंत तसा कुठला आक्षेप कोणी नोंदवत नाही, तोपर्यंत पवारांची जात ओबीसीच आहे, हे सिद्ध होते, असे वक्तव्य नामदेव जाधव यांनी केले.

त्यामुळे गोविंद बागेतली आजची दिवाळी सकाळी न आलेल्या अजित पवारांच्या भोवती फिरली, तर सायंकाळी शरद पवारांच्या जातीभोवती महाराष्ट्रात चर्चा रंगली.

Govind baugh diwali : first phase discussion on ajit pawar and 2nd phase discussion on sharad pawar’s caste

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात