बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रय योजनेवरून ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेला मोठा दणका देत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बीएमसीच्या “आश्रय योजनेच्या” चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी महाराष्ट्राच्या लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बीएमसीच्या आश्रय योजनेत १ हजार ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. Governor Koshyari’s big blow to Shiv Sena, orders inquiry into BMC’s ‘Ashray Yojana’
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रय योजनेवरून ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेला मोठा दणका देत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बीएमसीच्या “आश्रय योजनेच्या” चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी महाराष्ट्राच्या लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बीएमसीच्या आश्रय योजनेत १ हजार ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
बीएमसीच्या ‘आश्रय योजने’बाबत भाजपच्या आरोपांनुसार, सीव्हीसी (केंद्रीय दक्षता आयोग) नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. नियमानुसार, एखाद्या निविदेत केवळ एकच सहभागी झाला, तर निविदा परत मागवल्या पाहिजेत, मात्र तसे झालेले नाही. आश्रय योजनेअंतर्गत बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधली जात होती.
BMC आणि शिवसेनेने मिळून 1800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या प्रकरणाची तक्रार केली होती आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लोकायुक्तांकडे करण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App